आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र सरकारने लॉकडाउनच्या काळात दिलासा देताना सोमवारपासून नॉन कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह दारुच्या विक्रीला सुद्धा परवानगी दिली. परंतु, 5 जिल्ह्यांनी दारु विक्रीला विरोध केला. सोमवारपासून राज्यात मद्यविक्रीला परवानगी दिली जात असली तरीही सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावतीने मद्य विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे. या सर्वच जिल्ह्यातील प्रशासनाने तसे आदेश काढले आहेत. अत्यावश्य वस्तू आणि सेवांसह मद्य विक्री सुरू करण्याचा निर्णय महसूल वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राज्य सरकारला मद्य विक्रीतून 45 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु, कोरानामुळे गेल्या दीड महिन्यांपासून यावर बंदी होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय महामारी कायदा आणि महामारीचा फैलाव रोखणे या गोष्टी लक्षात ठेवूनच करण्यात आला आहे. बुलडाणा आणि अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा 17 मे पर्यंत मद्य विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला. या पाचही जिल्ह्यांमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांना परवानगी असणार आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात वायनरी आणि मद्य उत्पादन कारखाने आहेत. या सर्वांनाच राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयाने खूप अपेक्षा होत्या. परंतु, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने त्यांना विक्रीची परवानगी तुर्तास देणार नाही असा निर्णय घेतला आहे.
सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावतीने संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवली. तर नागपूरने सुद्ध आपल्या शहराच्या हद्दीत दारु विक्री होणार नाही असा आदेश काढला आहे. नागपूरमध्ये हा निर्णय केवळ महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भाज नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला नाही. अर्थातच नागपूरमध्ये ही बंदी केवळ शहर आणि महापालिका हद्दीत राहणार आहे. ग्रामीण नागपूरमध्ये अशी कुठलीही बंदी नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.