आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Lockdown Again In Maharashtra | War Continues, Cities Closed! Aurangabad, Beed, Parbhani, Nashik, Mumbai, Navi Mumbai, Thane, Kalyan Dombivali, Panvel, Akkalkot, Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छुपे लाॅकडाऊन:युद्ध सुरूच, शहरे बंद! औरंगाबाद, बीड, परभणी, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अक्कलकोट, नाशिक शहरांचा समावेश

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण 19 शहरे-तालुक्यांमध्ये कुठे संचारबंदी, तर कुठे जनता कर्फ्यू

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा १ लाखाच्या पार पोहोचला असला तरी कोरोनाशी युद्ध अजून संपलेले नाही. वाढत्या प्रकोपामुळे मुंबई, ठाणे, औरंगाबाद, बीड, परभणीसह विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा ८ ते १० दिवसांची संचारबंदी, जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

  दररोज रुग्णसंख्येचा वेग वाढल्याने राज्यातील १९ शहरांमध्ये संचारबंदी, जनता कर्फ्यू लागू करून कोरोना साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मंुबई प्राधिकरणाच्या ५ महापालिका क्षेत्रांत लाॅकडाऊनबाबत आपल्याला विश्वासात घेतलेले नाही, अशी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची तक्रार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. यासंदर्भात पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

मुंबईसह राज्यातील सामुदायिक संसर्गाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांमध्ये मतभेद

> मुंबई आणि आसपासच्या परिसरात १५ ते २० टक्के सामुदायिक संसर्ग झाल्याचे मान्य करून सरकार त्यावर काम करत आहे, असे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

>आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मात्र सामुदायिक संसर्गाचा दावा फेटाळला. मुंबई क्षेत्रातील या लाॅकडाऊनचा सामुदायिक संसर्गाशी संबंध जोडू नका. राज्यात सामुदायिक संसर्ग नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

एकूण १९ शहरे-तालुक्यांमध्ये कुठे संचारबंदी, तर कुठे जनता कर्फ्यू

> उत्तर महाराष्ट्र : नाशकात सायंकाळी ७ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू. नगरच्या राहाता तालुक्यातही संचारबंदी

> विदर्भ : बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुका १५ जुलैपर्यंत लॉकडाऊन. अमरावतीतील बडनेरा, अंजनगाव सुर्जी व अकोलाच्या अकोट तालुक्यात ३ जुलैपासून जनता कर्फ्यू.

> सोलापूर : अक्कलकोट मध्ये ६ जुलै ते १३ जुलै आणि वैरागमध्ये २ ते ५ जुलै कालावधीत जनता कर्फ्यू.

> कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी.

> मुंबई विभाग : मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात २ ते १० जुलै, कल्याण-डोंबिवली व ठाणे महापलिका क्षेत्र ३ ते १२ जुलै व पनवेल आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४ ते १४ जुलै लॉकडाऊन.

> मराठवाडा : औरंगाबादेत २ ते १५ जुलै, परभणी शहरात ३ ते ५ जुलै संचारंबदी असेल. बीड जिल्ह्यात २ ते ९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील तसेच महाविद्यालये आणि संबंधित कार्यालयांतील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...