आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी गाइडलाइन:संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावता येणार नाही, जिल्ह्यांत लावता येईल; राज्यात मंगळवारी 28,699 रुग्णांची वाढ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही राज्यांत कोरोनाच्या वाढत्या नव्या रुग्णांकडे पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी नवीन एसओपी जारी केली आहे. ती १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत लागू राहील. गाइडलाइनमध्ये केंद्राने स्पष्ट केले की रुग्णांच्या वाढीवर नियंत्रणासाठी जिल्हा/उप-जिल्हा/शहर/वॉर्ड स्तरावर लॉकडाऊन लावता येऊ शकेल. अशा स्थितीत राज्यस्तरीय लॉकडाऊनची गरज नाही. सामान आणि लोकांसाठी इंटर स्टेट (राज्यांतर्गत दळणवळण) आणि इंट्रा स्टेटबाबत (एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणे) निर्बंध घातले जाऊ नये. त्यात म्हटले आहे की, राज्यांनी मास्क वापरणे, सॅनिटायझेशन आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घ्यावे. त्यासाठी दंडही लावावा. नव्या गाइडलाइनमधील बहुतांश मुद्दे पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतून समोर आले होते.

- राज्यांनी टेस्ट, ट्रॅक व ट्रीटच्या धोरणावर काम करण्यास भर द्यावा.

- राज्यांनी आरटी-पीसीआर टेस्टचे प्रमाण ७०% पर्यंत वाढवले पाहिजे.

- नव्या कोरोना रुग्णाची माहिती मिळताच वेळेवर उपचार व्हावे आणि त्याच्यावर नजरही ठेवली जावी.

- काँटॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वाॅरंटाइन करण्यात यावे.

- जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर कंटेनमेंट झोनची माहिती टाकावी. याची आरोग्य मंत्रालयाशी शेअर करावी.

- केंद्राने दिलेल्या कंटेनमेंट धोरणाचे सर्व राज्यांनी कठोरपणे पालन करावे.

- पॉझिटिव्ह रुग्ण आणि संपर्काच्या ट्रॅकिंगच्या आधारे जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म पातळीवर कंटेनमेंट झोन बनावावे.

- कंटेनमेंट झोनबाहेर सर्व प्रकारचे व्यवहार सुरू ठेवता येतील.

- लसीकरणाचा वेग कमी असलेल्या सर्व राज्यांनी वेगवान लसीकरण करावे.

राज्य : २८,६९९ ने रुग्ण, १३२ मृत्यू
राज्यात मंगळवारी २८,६९९ रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात तब्बल १३२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या २ लाख ३०,६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.रिकव्हरी रेट ८८.७३% वर आला.

विदर्भ : ६१२५ नवे रुग्ण, ५२ मृत्यू
विदर्भात मंगळवारी ६१२५ नवे रुग्ण, तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. पूर्व विदर्भात ३९ मृत्यू झाले. नागपूर जिल्ह्यात ३३, तर वर्धा जिल्ह्यात ६ मृत्यू झाले आहेत. पश्चिम विदर्भात ११ जणांचे मृत्यू झाले.

मराठवाडा : ४८३१ नवे रुग्ण, ५१ मृत्यू
मराठवाड्यात ४८३१ नवे रुग्ण, ५१ जणांचा मृत्यू झाला. आैरंगाबादेत १७९१, जालना ५५३, परभणी २७०, हिंगोली १०९, नांदेड १३३०, लातूर ४४१, उस्मानाबाद १३०, बीड २०७ रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र... आदित्यपाठोपाठ रश्मी ठाकरेंनाही काेरोना, धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा
- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंपाठोपाठ त्यांच्या आई रश्मी उद्धव ठाकरे यांनाही कोरोना झाला आहे. मंत्री धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संसर्ग झाला आहे.
- परभणी : जिल्ह्यात २४ मार्चच्या संध्याकाळी ७ वाजेपासून ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत नाइट कर्फ्यू सुरू होता.
- उत्तर प्रदेश : जास्त रुग्णसंख्येच्या राज्यांतून यूपीत येणाऱ्या लाेकांसाठी चाचणी सक्तीची असेल. ८ वीपर्यंतच्या शाळा २४ ते ३१ मार्चपर्यंत बंद असतील.

बातम्या आणखी आहेत...