आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Lockdown: Chief Minister Uddhav Thackeray Said Rising Demand For Oxygen Due To Increasing Corona Cases In The State; Lockdown: Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात कोरोना:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले- राज्यात वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, इंडस्ट्रीजमधील ऑक्सिजनही रुग्णालयांना देण्याचा विचार

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सध्याला 1200 मेट्रीक टन ऑक्सिजनचा उत्पादन होतो

महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये रुग्णालयात दिवसेंदिवस ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान ऑक्सिजन उत्पादनातील 100 टक्के कोटा हा रुग्णालयांना पुरवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, रुग्णालयात होत असलेला मागणीचा पुरवठा लक्षात घेता आता उद्योग समुहातील ऑक्सिजन रुग्णालयांना द्यावे लागू शकते.

राज्यात सध्याला 1200 मेट्रीक टन ऑक्सिजनचा उत्पादन होतो. त्यातील 80 टक्के ऑक्सिजन रुग्णालयांना दिले जात असून 20 टक्के ऑक्सिजन उद्योगाला दिले जात आहे. परंतु, कोरोना संक्रमनानंतर ऑक्सिजनचा वापर 700 मेट्रीक टन पर्यंत वाढला आहे. मुख्यमंत्री ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की, हीच परिस्थिती कायम राहिल्यास ऑक्सिजन उत्पादनाचा 100 टक्के कोटा हा फक्त रुग्णालयांना द्यावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.

गेल्या महिन्यातच बदल झाले

राज्याच्या आरोग्य विभागाने 30 मार्च रोजी ऑक्सिजन तयार कंपन्यांना वैद्यकीय वापरासाठी 80०% आणि उर्वरित २०% उद्योगांना देण्याचे निर्देश दिले होते. परंतु, हा आदेश 30 जून पर्यंतचा होता. शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, संसर्ग दिवसेंदिवस धोकादायक होत असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्योगांचा २०% कोटाही रुग्णालयांना देण्याचा विचार केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...