आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases Update; We Have Not Even Learned To Fight Corona, Now It Is Possible To Avoid These Measures, Know The Opinion Of 4 Experts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन शेवटचा पर्याय:पंतप्रधान मोदींच्या 'या' मताशी देशातील तज्ञांची सहमती; कोरोनाच्या लढाईत सरकार कुठे चुकले?

मुंबई25 दिवसांपूर्वीलेखक: दिग्विजय सिंह
 • कॉपी लिंक
 • सरकार आरोग्य सेवा सुधारण्यात अपयशी ठरले, वर्षभरात या क्षेत्रात कोणतीही मोठी पावले उचलली गेली नाही.

देशात कोरोना महामारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाखांवर सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, अत्यावश्यक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवायला लागत आहे. गेल्या आठवड्यांपासून देशात दररोज अडीच लाखांवर लोक कोरोनाच्या विळ्याख्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना संवाद साधला होता. त्यामध्ये मोदी यांनी कोरोना महामारीला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याचे सांगितले होते. दरम्यान, यावर देशातील काही तज्ञ लोकांमध्ये सहमती झाली असून त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

देशात पुन्हा एकदा सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीच्या टीमने वेगवेगळ्या चार क्षेत्रातील तज्ञांची मते जाणून घेतली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य धोरण तज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया, सेवानिवृत्त बँकर आणि बाजार तज्ज्ञ अजय बग्गा यांचा समावेश आहे.

काय म्हणतात भारतातील तज्ञ

 • सर्व तज्ञांमध्ये लॉकडाऊन न लावण्यावर एकमत
 • लॉकडाऊनऐवजी अनावश्यकपणे घर सोडणाऱ्यांवर निर्बंध लावले पाहिजे
 • सरकार आरोग्य सेवा सुधारण्यात अपयशी ठरले, वर्षभरात या क्षेत्रात कोणतीही मोठी पावले उचलली गेली नाही.
 • युरोपच्या धर्तीवर सामाजिक सुरक्षा वेज दिले पाहिजेत, ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये जबाबदारीची भावना जागृत होईल.

गेल्या वर्षीसारखे लॉकडाऊन लागण्याची शक्यता कमी
सेवानिवृत्त बँकर आणि बाजार तज्ञ अजय बग्गा सांगतात की, देशाच्या जीडीपीमध्ये सर्विस क्षेत्रांची मोठी भागीदारी असून हे क्षेत्र गेल्या एकवर्षापासून सुधरत नाही आहे. सध्या देशातील प्रमुख राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे असंघटीत क्षेत्रातील कामगार घरचा रस्ता पकडत आहे. याचे संपूर्ण परिणाम उद्योग क्षेत्रांवर जाणवत आहे.

लॉकडाऊनला शेवटचा पर्याय सांगता येणार नाही - डॉ. चंद्रकांत लहरिया
सार्वजनिक आरोग्य धोरण तज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया सांगतात की, लॉकडाऊन कोरोना महामारीला रोखण्याचे एकमेव पर्याय नसून हे यामध्ये फक्त आरोग्य सेवा सुधारण्यासाठी वेळ मिळतो. डॉ. लहरिया यांच्या मते, देशात सध्या कोरोना महामारीचा जो संसर्ग वाढत आहे तो 10-15 दिवसांपूर्वीचा आहे. त्यामुळे कोरोना महामारीला जर रोखायचे असेल तर देशातील अनावश्यकपणे घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कठोर पावले उचलली पाहिजे. त्याचबरोबर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...