आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रासहित संपूर्ण देशात 14 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुढील 14 दिवस रेड झोनमध्ये कोणत्याही प्रकराची सूट दिली जाणार नाही. परंतु ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही सवलती मिळतील. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांच्या संख्येनुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनची विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत रेड झोनची संख्या 11 पेक्षा वाढून 14 झाली आहे. यासोबतच ग्रीन झोनची संख्या नऊने कमी होऊन 6 वर आली आहे. या व्यतिरिक्त काही जिल्हे असेही आहेत जे पहिले रेड झोनमध्ये होते आणि तेथील रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ते ऑरेंज झोनमध्ये आले आहेत.
महाराष्ट्रात झोनची स्थिती
रेड झोन
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सोलापुर, जळगाव, यवतमाळ, सातारा, धुळे, अकोला, औरंगाबाद आणि नागपूर
ऑरेंज झोन
रत्नागिरी, रायगड, परभणी, सांगली, बीड, अहमदनगर, नंदुरबार, कोल्हापुर, नांदेड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपुर आणि भंडारा
ग्रीन झोन
उस्मानाबाद, वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.