आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात येत्या २ एप्रिलपासून मर्यादित टाळेबंदी लावण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील वेळेपेक्षा वेगळा असेल. याचे स्वरूप ५० टक्के लॉकडाऊन आणि ५० टक्के निर्बंध असे असण्याची शक्यता आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिले. राज्यात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पण सध्या कोरोना संसर्ग अाटोक्यात ठेवण्यासाठी निर्बंध कठोर करण्याची तयारी मात्र सुरू आहे.
नागरिकांनी त्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे टोपे म्हणाले. सध्याचे कोरोनाविषयक निर्बंध कठोर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय झाल्यावर सांगण्यात येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. मात्र त्याच वेळेस नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे आवाहनही त्यांनी केले.लसीकरणाचा वेग लक्षात घेता लवकरच राज्यात हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) तयार होईल आणि कोरोनाचे सध्याचे वाढू लागलेले प्रमाण कमी होईल, अशी आशा टोपे यांनी व्यक्त केली
खाटा वाढवण्याचे आदेश
मुंबईत आयसीयूच्या ४०० खाटा आहेत. ऑक्सिजन खाटांची संख्या दोन हजार इतकी आहे. कृत्रिम श्वसनयंत्राची सुविधा असलेल्या खाटा पुरेशा आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खाटा कमी पडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. खाटा वाढवण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत, असे टोपे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.