आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Lockdown In Maharashtra Extended Till May 31; The Rules In The Green And Orange Zones Are Relaxed, While In The Red Zones More Care Is Needed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन 4.0:महाराष्ट्रातही लॉकडाऊनच्या कालावधीत 31 मेपर्यंत वाढ

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • राज्य सरकारच्या पूर्वीच्याच मार्गदर्शक सूचना लागू

राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू राहतील, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. विभागनिहाय सूट किंवा लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे. यापूर्वी दि. २ मे २०२० रोजीच्या आदेशानुसार राज्यात १७ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच त्यात गरजेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात लॉकडाउन असूनही संक्रमितांच्या संख्येत विशेष घट होत नाहीये, त्यामुळे हा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होईल.  त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. दरम्यान, या लॉकडाउन चारमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. परंतू, रेड झोनमध्ये अधिक काळजी घेतली जाणार आहे.

 • लॉकडाउनचे टप्पे
 • लॉकडाऊन एक - 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
 • लॉकडाऊन दोन - 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
 • लॉकडाऊन तीन- 4 मे ते 17 मे (14 दिवस)
 • लॉकडाऊन चार- 18 मे ते 31 मे (14 दिवस)
बातम्या आणखी आहेत...