आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक द चेन:मुख्यमंत्री आज राज्यातील लॉकडाऊन संदर्भात करणार घोषणा? अस्लम शेख यांनी दिले संकेत

मुंबई9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कोरोनाचे संक्रमण रोखता यावे यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. राज्यात लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इशारा दिलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून यावर मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान आजच राज्यातील लॉकडाऊनविषयी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोनाचे संक्रमण रोखता यावे यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. वीकेंड लॉकडाऊनही करण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांमध्ये सात्त्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. रुग्ण वाढीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. हा ताण लक्षात घेता राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. आज या निर्णयाची घोषणा केली जाऊ शकते असे संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत.

याविषयी प्रसार माध्यमांशी बोलताना अस्लम शेख म्हणाले की, 'विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. जनतेने देखील हे समजून घ्यायला हवे. एका आठवड्यापासून हे प्रयत्न सुरू आहे, पण कुठेही कमतरता दिसत नाही. यामुळेच मला असे वाटतेय की, राज्य सरकार आजच यासंदर्भातील मोठा निर्णय घेऊ शकते. रात्री आठ वाजता येऊन लोकांसमोर बोलायचे, लोकांना लॉकडाऊन या शब्दाची भीती वाटते. लोक मग या मानसिकतेतून बाहेर येत नाही. राज्य सरकारला चेन ब्रेक करायची आहे. लोकांना सोबत घेऊन लोकांचे म्हणणे ऐकूण आम्हाला हे करायचे आहे. पुढील काळासाठी चांगल्या गाईडलाईन्स तयार करण्यासाठी आम्ही लागलो आहोत. या विषयी आजच मुख्यमंत्री निर्णय घेतली असे मला वाटते'

बातम्या आणखी आहेत...