आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:नवी मुंबईत 29 जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन, पालकमंत्री एकनाथ शिंदेनी केली घोषणा 

नवी मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात नवी मुंबईही पुढे आहे. येथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. येथील भागांमध्ये दररोज 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईत आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 29 जूनपासून येथे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे पालकमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. कारण येथे जवळपास 44 कंटेन्मेंट झोन आहे. या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. 7 दिवसांसाठी हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान 26 जून रोजी नवी मुंबईमध्ये 224 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या खूप जास्त आहे. आता येथील कोरोना बाधितांचा आकडा हा 5 हजार 853 वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथील 194 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता ही वाढली आहे. धोका टाळता यावा यासाठी लॉकडाऊनचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...