आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Lockdwon 3 In Maharashtra : Except For The Cantonment Zone In The State, Liquor Shops Are Open In Marathwada, But The Bottle Is Horizontal!

आजपासून नवीन सवलती लागू:राज्यात कंटेनमेंट झोन वगळता मद्य दुकाने सुरू मराठवाड्यात मात्र बाटली आडवीच!

मुंबई2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारकडून परवानगी : जीवनावश्यक वस्तू नसलेली एकाच ओळीतील ५ दुकाने सुरू

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून अनेक ठिकाणी झोननिहाय निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्र वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टँड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यात मद्यविक्रीच्याही दुकानांचा समावेश आहे. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांसाठी स्थापन केलेल्या टास्कचे प्रमुख भूषण गगराणी यांनी यासंदर्भातील माहिती रविवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मराठवाड्यात रुग्णवाढीचा वेग पाहता पूर्वीचेच निर्बंध कायम ठेवले आहेत, त्यात कुठलीही शिथिलता दिली जाणार नाही, असे औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत कायम असणार आहे. राज्याची रेड, ऑरेंज व ग्रीन अशा श्रेणीत विभागणी केली आहे. रेड झोनमधील दुकाने ४ मेपासून खुली होत आहेत. रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता बाकीच्या सर्व झोनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे.

लाॅकडाऊनमुळे राज्याचा १ लाख ४० हजार कोटींचा महसूल बुडण्याचा अंदाज

> लाॅकडाऊनमुळे राज्याचा १ लाख ४० हजार कोटींचा महसूल बुडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मद्य दुकाने उघडण्यात यावीत, अशी मागणी हाेत होती. उत्पादन शुल्क करांच्या माध्यमातून राज्याला यंदा १९ हजार २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.

> रेड झोनमध्ये मुंबई महानगर, पुणे महानगर, मालेगाव पालिका हा एक भाग आहे. दुसऱ्यात उर्वरित भाग असेल. स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रातील कंटेनमेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड) तयार केलेेत. दुकानांबाबत सवलती देताना त्याचा विचार करता येईल.

कंटेनमेंट झोन : पूर्वीप्रमाणेच सर्व निर्बंध कायम. जीवनावश्यक वस्तू नसलेली एकल दुकाने व बांधकामांनाही या झोनमध्ये बंदी असणार आहे. मुंबई व पुणेसह रेड व कंटेनमेंट झोनमधील ब्यूटी पार्लर, केशकर्तनालय, सलून व स्पा सुरू करण्यास अद्याप निर्बंध लागू आहेत.

इलेक्ट्रॉनिक, मोबाइल, स्टेशनरी आदी दुकाने उघडता येणार

> जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका लेनमधील जीवनावश्यक वस्तू नसलेली व स्वतंत्रपणे असलेली ५ एकल दुकाने सुरू करता येतील. त्यात इलेक्ट्रॉनिक, मोबाइल, स्टेशनरी, मद्यविक्री आदी दुकानांचा समावेश आहे.

> एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त दुकाने सुरू करता येणार नाहीत. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा समावेश नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे या नियमांचे पालन करणे आवश्यक. मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारातील दुकाने बंदच.

एकल दुकाने म्हणजे : एकल दुकाने म्हणजे ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत अशी दुकान. दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील.

रेड झोन : १४ जिल्हे
मुंबई, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, नाशिक, धुळे, अकोला, यवतमाळ,

ग्रीन झोन
सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशीम, वर्धा, गडचिरोली

ऑरेंज झोन : १६ जिल्हे

रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, नगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदुरबार

मराठवाड्यात आधीचेच लाॅकडाऊन कायम

औरंगाबाद | मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्याचे लॉकडाऊन पुढेही कायम ठेवावे, असे मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मुख्यमंत्र्याच्या आढावा बैठकीत व्यक्त केले. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनमधील पूर्वीचे निर्बंध कायम ठेवून दारू दुकाने बंदच ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. औरंगाबाद रेड झोनमध्ये आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आैरंगाबादेतही दारू दुकाने बंदच राहतील, असे जिल्हाधिकारी उदय चाैधरी यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...