आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव:लोगो, पोस्टरची निर्मिती होणार ; सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारा लोगो आणि पोस्टरची अंतिम निवड करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्‍तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाडयात शासकीय सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणे तसेच सांस्कृतिक कार्य विभागातील विविध विषयांवरील बैठक आज सह्याद्री अतिथिगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्‍तिसंग्रामाला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या संग्रामाची माहिती, इतिहास सोप्या व सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मराठवाडा सांस्कृतिक महोत्सव मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येईल. मराठवाड्यातील स्थानिक कलाकारांना यामध्ये समावेश असेल. नाट‌्यगृहे अद्ययावत करणार : नाट्यचळवळ सुरू राहावी याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न राहिल. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना त्यात सोलार, एअर कंडिशन व्यवस्था, साउंड सिस्टिम, खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या बाबींचा समावेश असेल.

बातम्या आणखी आहेत...