आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र आव्हाडाचे ट्विट:-म्हणाले- टिळकांनी शिवरायांची समाधी बांधण्यासाठी समिती स्थापली, पैसेही जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवरायांची समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही असे खळबळजनक ट्विट करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला असे दुसरे ट्विटही आव्हाड यांनी केले.

मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली. त्यावेळी त्यांनी शरद पवार हे जाती-जातीत विष पेरण्याचे काम करीत आहेत असा आरोप करून त्यांनी काही दाखले दिले होते. त्यात लोकमान्य टिळकांनी वर्तमानपत्र काढले त्याचे नाव मराठा होते असा उच्चार केला होता. आता हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दोन आशयपुर्ण आणि तेवढेच गंभीर ट्विट केले आहेत.

काय आहे आव्हाडांचे ट्विट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.

आव्हाडांचे दुसरे ट्विट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली असेही त्यांनी नमूद केले.

हे ट्विट पोस्ट करतानाच त्यांनी एक पत्रही पोस्ट केले आहे. हा दस्ताऐवज ब्रिटीशकालीन असून आव्हाडांनी हे पत्र व्यवस्थित वाचा अशी सुचनाही पोस्टमधून केला आहे.

बातम्या आणखी आहेत...