आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-ट्रान्सहार्बर लिंकवर सर्वात लांब स्टील डेक लाँच:चार ते पाच बोइंग विमानांएवढे डेकचे वजन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (एमएमअारडीए) मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकचा (एमटीएचएल) सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक यशस्वीरीत्या लाँच केला आहे. या डेकचे वजन सहा बोइंग विमानाएवढे आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. एमटीएचएल प्रकल्प दक्षिण मुंबईला नवी मुंबई शहराशी जोडेल. एमएमआरडीए ही राज्य सरकारची संस्था असून जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने वित्तपुरवठा केलेल्या २१.८ किमीच्या सहा लेनच्या एमटीएचएल प्रकल्पाकरिता अंमलबजावणी प्राधिकरण आहे.

पूर्ण झाल्यावर, हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असेल. या सेतूवरून दररोज ७०,००० वाहनांची वाहतूक होईल. सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक मंगळवारी सायंकाळी प्रस्थापित करण्यात आला. हा डेक २० किमी लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकचे पॅकेज-१ मध्ये मोडतो. ते १८० मीटर लांब आणि २,४०० मेट्रिक टन वजनाचे अाहे. हे वजन पाच ते सहा बोइंग विमानांएवढे आहे, असे एमएमआरडीएने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून उभारण्यात येणाऱ्या एकूण ३८ ओएसडीपैकी हा १४ वा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असून हे पॅकेज-१ चे दुसरे १८० मीटर लांबीचे ओएसडी आहे. पहिला ओएसडी या वर्षी एप्रिलमध्ये स्थापित करण्यात आला होता. मुंबई-ट्रान्सहार्बर लिंकवर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक बसवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...