आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी भव्य मशाल मोर्चा:प्रभू राम सर्वांच्या मनात; पण आम्ही कधीही मार्केटिंग केले नाही : काँग्रेस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाला गेले आहेत. याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही. प्रभू राम सर्वांच्या मनात आहेत. आमच्यासुद्धा मनात आहेत. पण आम्ही त्यांचे कधीही मार्केटिंग केले नाही. त्यांनी खुशाल प्रभू रामाच्या दर्शनाला जावे. पण त्याआधी महाराष्ट्रात जे रावण बोकाळले आहेत त्यांचे काय ? त्यांचा आधी बंदोबस्त करा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. देशाला हुकूमशाही पद्धतीने चालवू पाहणाऱ्या केंद्र व राज्य सरकारविरोधात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता भव्य मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनता दल, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप, सीपीआय, भारतीय कामगार सेना, जनता दल सेक्युलर तसेच काही सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रसिद्धी न करता आम्ही देवाला जातो : अजित पवार मीही देवाला जात असतो. मात्र, प्रसिद्धी करत नसतो. लोकांचे दैनंदिन जीवनाचे प्रश्न महागाई, बेरोजगारी, कोरोना वाढते प्रमाण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महत्त्वाचे श्रद्धास्थान असेल त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार प्रत्येकास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री अयोध्याला गेले आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळणार असून आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत, असा टाेला पवारांनी शिंदेंना लगावला.