आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:'प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही', जितेंद्र आव्हाडांचे भाजपवर टीकास्त्र

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असं म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र साधलं

अयोध्येत येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत आहे. मात्र या सोहळ्यावरुन भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटल्याचे चित्र पाहायला मिळतेय. आता मंत्री जितेंद्र आव्हाडांनी यावरुन भाजपवर विखारी टीका केली आहे. 'श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही असे ते म्हणाले.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, रामाच्या नावे राजकारण करणं वेगळी गोष्ट आणि भक्ती करणं वेगळी गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला असतो. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो…त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचं एवढं काही नाही… त्यांना करावं वाटतंय ते करत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं असा आरोपही त्यांनी भाजपवर लगावला आहे.