आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान भवनाच्या आवारात नेत्यांमध्ये खडाजंगी:लव्ह जिहाद अस्तित्वात नाही- आझमी, माझ्यासोबत या, सिद्ध करेन-नितेश राणे

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे व सपाचे आमदार अबू असीम आझमी यांच्यात मंगळवारी विधान भवनाच्या आवारात जोरदार खडाजंगी झाली. मी तुम्हाला ५० ठिकाणी घेऊन जातो. जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की ‘लव्ह जिहाद’ नावाची कोणताही प्रकार अस्तित्वात नाही, असे आव्हान आझमी यांनी दिले. त्यावर तुम्ही मला वेळ आणि जागा सांगा. मी तुम्हाला माझ्या गाडीत घेऊन जाईन. आणि ‘लव्ह जिहाद’ आहे हे सिद्ध करेन, असे प्रतिआव्हान आमदार राणे यांनी आझमी यांना दिले.

विधान भवनाच्या आवारात दोन्ही नेत्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून सुमारे १० मिनिटे खुली चर्चा झाली. जा व हिंदू मुलीशी लग्न कर असे म्हणणारा एकही मुस्लिम तुम्हाला संपूर्ण भारतात सापडणार नाही, असा दावा आझमी यांनी केला. तसेच ‘बेटी वाचवा आणि सून आणा’च्या नावाखाली मुस्लिम मुलीशी लग्न करण्यासाठी दोन लाख देणाऱ्या अनेक हिंदूंचे विधान मी पुरावा म्हणून देऊ शकतो, असे सांगून काही लोक या देशातील मुस्लिम समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत, असे आझमी म्हणाले.

मुंबईच्या ग्रीन झोनमध्ये तीन मजली मदरसा बांधल्याचा आरोप
मुंबईत ग्रीन झोनमध्ये तीन मजली मदरसा बांधण्यात असून तो तोडण्यासाठी कोणी गेले तर काही लोक प्राणघातक शस्त्रे घेऊन पुढे येतात,असा आरोप राणे यांनी केला. तर ‘कोणी बेकायदा धार्मिक स्थळ बनवले असेल तर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व समाजातील लोकांची अशी बेकायदा बांधकामे पाडून टाकावीत,’ असे उत्तर आझमी यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...