आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत गुलाबी थंडी:गेल्या 10 वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद, 2 दिवस हुडहुडी कायम राहणार

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याची थंडी पडली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही गुलाबी थंडी जाणवू लागली आहे.

मुंबईतील पारा 19 अंशांवर आला आहे. गेल्या 10 वर्षातील नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद मंबईत झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान 30 नोव्हेंबर 2012 रोजी 19.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

मुंबईतील प्रमुख भागांमधील हवामान

बोरिवली - 21.6 अंश सेल्सिअस, कांदिवली - 17.4 अंश सेल्सिअस, विलेपार्ले - 20.3 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ - 18.2 अंश सेल्सिअस, कुर्ला - 26.4 अंश सेल्सिअस, तर पवईत 19.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. काल 21 नोव्हेंबर रोजी रात्री मुंबईचे किमान तापमान उपनगरात (सांताक्रूझ) 19 अंश सेल्सिअस आणि मुंबई शहरात 21 अंश सेल्सिअस होते. म्हणजेच गेल्या जवळपास 10 वर्षात काल मुंबईत सर्वात कमी किमान तापमान होते.

ओझर @ 5.6

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सर्वच भागांत थंडी वाढली असून सलग दुसऱ्या दिवशी कडाका कायम होता. आगामी दोन दिवस थंडीचा हा कडाका राहणार असून त्यानंतर दहा दिवस राज्यात गुलाबी थंडीमुळे हुडहुडी कायम राहील. राज्यात ओझरला सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी ५.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

10 अंशांपेक्षा कमी तापमान असलेले जिल्हे
निफाड- 7, धुळे - 7.4, परभणी - 8, जळगाव - 8.2, पुणे- 8.8, औरंगाबाद - 8.9, नाशिक - 9.2, यवतमाळ - 10

बातम्या आणखी आहेत...