आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Lucknow Police Cracks Down On Raj Kundra's Actress Wife Shilpa Shetty, Who Is Involved In Porn Films, Statement Will Be Recorded In The Case Of Fraud

लखनऊच्या महिलेचा खुलासा:शिल्पाच्या कंपनीने दरमहा 5 लाख कमवण्याचे अमीष देऊन 1.36 कोटी रुपये हडपले; महिलेच्या आरोपानंतर अभिनेत्रीसह आईविरुद्ध FIR दाखल

मुंबई / लखनऊ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या एका महिला उद्योजकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्योत्सना चौहान असे त्या महिलेचे नाव असून तिने दिव्य मराठीशी बोलताना आपबिती मांडली आहे. शिल्पा शेट्टी आणि आईन सुनंदा यांच्या कंपनीने आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला. ज्योत्सना सांगते, तिने शिल्पाच्या कंपनीत 1.36 कोटींची गुंतवणूक करून लखनऊ येथे वेलनेस सेंटर सुरू केले होते. यानंतर शिल्पाच्या जवळच्या लोकांनीच ते हडप केले. ज्योत्सनाला गुंतवणूक करण्यापूर्वी शिल्पा शेट्‌टीचा व्हिडिओ दाखवण्यात आला होता.

ज्योत्सनाने पुढे सांगितल्यानुसार, जानेवारी 2019 मध्ये तिची भेट शिल्पा शेट्टीच्या जवळची व्यक्ती आणि अयोसिस कंपनीचा संचालक किरण बाबा याच्याशी झाली. किरणने ज्योत्सनाला कंपनीचे अनेक प्रेझेंटेशन दाखवले. सोबतच फ्रेंचायझी घेतल्यास दरमहा 5 लाख रुपये कमाई होणार असे आश्वासन दिले होते.

उद्घाटनात शिल्पा येणार असल्याचे आश्वासन
किरणसोबत विनय भसीन, अनामिका चतुर्वेदी, ईशरफील धरमजवाला, आशा आणि पूनम झा सुद्धा होते. त्या सर्वांनीच सांगितले होते, की शिल्पाच्या कंपनीत 85 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर वेलनेस सेंटर उघडताना उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी सुद्धा येणार आहे.

याच लोकांवर विश्वास टाकून ज्योत्सनाने एप्रिल 2019 मध्ये लखनऊच्या विभूतिखंड येथील रोहतास प्रेसिडेंशिअल आर्केडमध्ये 1300 चौरस फुटाचे दुकान भाड्यावर घेतले. याच ठिकाणी वेलनेस सेंटर उभारले. ज्योत्सनाने किरण बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. शिल्पाच्या कंपनीसोबत करारावर साइन करून घेऊ असे सांगितले. तेव्हापासून ते लोक टाळाटाळ करत आहेत.

4 पट महागात साहित्ये विकून लाखो रुपयांना लुटले
ज्योत्सनाने सांगितले, की सेंटर उघडल्यानंतर आरोपींनी टॉवेलपासून वॉलपेपर पर्यंत आपल्याच मर्जीने लावले. यानंतर कॉस्मेटिक आणि इतर सर्व साहित्ये मुंबईतून मागवले. जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये 5 हजार रुपयांत मिळू शकतात त्यासाठीच 15-15 हजारांप्रमाणे बिल पाठवायचे. काही दिवसांनंतर कंपनीकडून स्वतःचे कर्मचारी लावून सेंटर काबीज केली.

FIR दाखल होताच शिल्पाने शेअर्स विकले
सेंटरवर बाबाने ताबा घेतल्यानंतर ज्योत्सनाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पण, तोपर्यंत ज्योत्सनाने 1.36 कोटी रुपये गुंतवले होते. आपली एवढी मोठी रक्कम बुडत असल्याचे पाहून तिने विभूतिखंड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आपल्या विरोधात पोलिस तक्रार दाखल झाल्याचे ऐकताच शिल्पाने स्टेटमेंट जारी केले. तसेच आपली कंपनी अयोसिसचे शेअर्स किरण बाबाला विकत असल्याचे जाहीर केले. आता आपला या कंपनीशी काहीच संबंध नाही असेही शिल्पाने स्पष्ट केले.

घर तारण ठेवून घेतले होते कर्ज
ज्योत्सना एअरटेल कंपनीत नोकरी करत होती. तिचे पती आनंद कुमार राणा कोर्टात नोकरीला आहेत. शिल्पाच्या कंपनीतून मोठ्या कमाईच्या लालसेपोटी तिने आपली आयुष्यभराची बचत खर्च केली. पैसे कमी पडत होते तेव्हा घर तारण ठेवून 75 लाख रुपयांचे कर्ज घेतले. सेंटर बंद झाल्याने आपले सगळेच पैसे बुडाले असून दरमहा व्याज देखील वाढत असल्याचे ज्योत्सनाने सांगितले आहे.

शिल्पा शेट्टीची चौकशी होणार

विभूतिखंड पोलिलांनी 19 जून 2020 रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. परंतु, कित्येक दिवसांपासून कारवाईच केली नाही. त्यानंतर या प्रकरणाचा तपास चिनहट पोलिस स्टेशनमध्ये वळवण्यात आला. याची जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक अजय शुक्ला यांना देण्यात आली. शुक्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत झालेल्या चौकशीत फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. ज्योत्सनाने करार करून घेतला त्यावेळी शिल्पा शेट्टी अयोसिस कंपनीची चेयरपर्सन आणि आई सुनंदा संचालक होती. यांचा देखील तपास करण्यासाठी चौकशी होणार आहे. यासाठी औपचारिक कारवाई सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...