आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायझिंग स्टार:संघात निवड न झाल्याने खेळाच्या शैलीत बदल; गंभीरचे मार्गदर्शन मोलाचे, लखनऊ संघाचा युवा फलंदाज आयुषचे आयपीएल पदार्पणात शानदार अर्धशतक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत तीन वेळा आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेदरम्यान कानाडाेळा झाला. मात्र, कोणत्याही प्रकारे हताश न होता आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला आणि शैलीत माेठा बदल केला. यातून खेळाचा दर्जा उंचावल्याने आयपीएलमध्ये संधी मिळाली. याच संधीला सार्थकी लावताना २२ वर्षीय आयुषने लखनऊ संघाकडून आयपीएलचा पहिला सामना खेळला. यासह त्याने आयपीएलच्या पदार्पणात दमदार अर्धशतकी खेळी केली. यातून आयुषने साेमवारी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध ५४ धावांची खेळी केली. माजी क्रिकेटपटू गाैतम गंभीर सध्या लखनऊ सुपरजायंट्स संघाच्या मेंटरच्या भूमिकेत आहे. त्याच्या माेलाच्या मार्गदर्शनाखाली आयुषने आता सर्वाेत्तम कामगिरीची नाेंद केली. गुजरात संघाने सर्वाेत्तम खेळीतून लखनऊचा पराभव केला.

पदार्पणातील सामना; रात्र जागून काढली : आयुषच्या लखनऊ संघाने यंदापासून आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. या संघाचा स्पर्धेतील पहिला सामना साेमवारी गुजरातविरुद्ध झाला. याच सामन्याच्या पुर्वसंध्येला आयुषवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे ताे सामन्यापूर्वी रात्रभर झाेपू शकला नाही. कारण, जागतिक दर्जाच्या टी-२० स्पर्धेत त्याला पदार्पणाची संधी मिळणार होती. कामगिरीबाबत त्याच्या मनात प्रचंड भीती होती.

मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये पाच सामन्यांची संधी : आयुषची प्रतिष्ठेच्या रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत निवड होऊ शकली नाही. त्यामुळे त्याने आपल्या खेळीची शैली बदलून टाकली. आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला. यातून त्याला मुश्ताक अली ट्राॅफीसाठी संधी मिळाली. त्याने दिल्ली संघाकडून पाच सामने खेळले.

यूथ कसाेटी: श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८५ धावा, १० बळी : आयुषने २०१८ मध्ये यूथ कसाेटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध लक्षवेधी खेळी केली होती. त्याच्या नावे या सलामीच्या कसाेटीमध्ये २०५ चेंडूंमध्ये १९ चाैकार आणि ४ षटकारांसह नाबाद १८५ धावांची खेळी नाेंद अाहे. याशिवाय त्याने या दाेन कसाेटीत १० बळी घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...