आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:रश्मी ठाकरे यांना पितृशोक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • 76 वर्षीय माधव पाटणकर यांनी अंधेरीतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचे निधन झाल्याची माहिती सोमवारी समोर आली आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याच उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालावली अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शिवसेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. त्यांच्या माहितीप्रमाणे, 76 वर्षीय पाटणकर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. ते उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचे वडील होते.

रश्मी ठाकरे यांचे वडील पाटणकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना अंधेरी येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माधव पाटणकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...