आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO मदरश्यातील शिक्षकांची विद्यार्थ्याला मारहाण:ठाण्यातील प्रकार, 70 सेकंदांत मारले 70 फटके, गुन्हा दाखल होताच पलायन

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मदरशात एका अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मदरश्यातील शिक्षक 14 वर्षीय विद्यार्थ्याला काठीने बराच वेळ बेदम मारहाण करताना दिसत आहे.

याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध निजामपुरा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक फहाद भगत नूरी (32) हा गुजरातमधील भरूचचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. निजामपुरा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीमध्ये, 14 वर्षांचा मुलगा नेहमीप्रमाणे त्या दिवशी सकाळी मदरशात गेला होता, परंतु धडे नीट लक्षात न ठेवल्यामुळे 32 वर्षीय शिक्षकाने त्याला निर्दयीपणे मारहाण सुरू केली आणि जखमी केले असा उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकरणी अजून कुणालाही अटक झालेली नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थ्याला 70 सेकंदात 70 वेळा फटके मारले असे समोर आले आहे. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. मात्र मदरसा शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत 'दिनी मदरसा'च्या ट्रस्टीने एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनुसार, मदरसा भिवंडी परिसरातील दारूल उलूम हसनैन करीमानशी संलग्न आहे.

बातम्या आणखी आहेत...