आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maha Budget Session: Devendra Fadnavis Questions Uddhav Thackeray In Pooja Chavan Death Case, Maharashtra Budget Session Live News And Updates

पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक आक्रमक:मुख्यमंत्र्यांनीच सांगावे की त्या क्लिप्स खऱ्या की खोट्या, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात फडवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेवर सवाल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकारांशी संवाद साधताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची इतकी केविलवाणी मी अवस्था पाहिली नाही. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर जरूर ठरवा, पण तुमच्या नैतिकतेचे काय? असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची स्थिती अतिशय केविलवाणी आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये. मुख्यमंत्र्यांनी कालच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नैतिक धैर्य त्यांना साथ देत नसल्याचे दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्कत होता, पण त्यांना नैतिक धैर्य साथ देत नसल्याचे स्पष्ट दिसत होते. यवतमाळ रुग्णालयात जे घडले आणि ज्या ऑडिओ क्लिप्स समोर आल्या त्या खोट्या आहेत का हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल करताना खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. ज्या ठिकाणी सुसाईड नोट सापडते किंवा घटना घडते तिथेच तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी डेलकर प्रकरणाचा जरूर तपास करावा. यात एकाही भाजप नेत्याचा हात नाही. किंबहुना यात भाजप नेत्याचा हात नसल्यानेच ते कुणाचेही नाव सांगत नाहीत, असा दावा फडणवीस यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...