आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मंत्रिमंडळ बैठक:व्हीसीद्वारे प्रथमच पार पडली मंत्रिमंडळाची बैठक; आता ५ रुपयांत शिवभोजन, केशरी रॅशन कार्ड धारकांना स्वस्त दरात अन्नधान्य

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी विशेष तरतूद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याच्या इतिहासात प्रथमच व्हिडिअो कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. सरकारने पुढील ३ महिन्यांसाठी शिवभोजन थाळी १० रुपयांऐवजी ५ रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. यासाठी केंद्रचालकाला वाढीव ५ रुपये अनुदान दिले जाईल. या योजनेचा तालुका स्तरावर विस्तारही केला जाईल. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.  इतर राज्यांतील मजूर, कामगार स्थलांतरित अशा ५.५० लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे.

केशरी रेशनकार्ड धारकांनाही सवलतीत धान्य

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना ८ रुपये किलोने गहू व १२ रुपये किलोने धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली. ३ कोटी लोकांना याचा फायदा होईल. 

एमपीएससी स्पर्धा परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २६ एप्रिल व १० मे रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन्ही पुढे ढकलल्या आहेत. 

भाजप आमदारावर गुन्हा

पंढरपूर : संचारबंदी सुरू असतानाही चैत्री एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केल्याप्रकरणी भाजप आमदार सुजितसिंह ठाकुरांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

‘लर्न फ्रॉम होम’

मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घरूनच अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्यास सरकारने सांगितले आहे.

राज्यात पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक ही व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः हातात सॅनिटायझर घेऊन जाताना दिसून आले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या सॅनिटायझरने सहकाऱ्यांचे हात स्वच्छ करण्यातही मदत केली.

बातम्या आणखी आहेत...