आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोषणा:रिटायरमेंटपर्यंत सरकारी घरात राहू शकतील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्र पोलिसांचे कुटुंबीय, वारसांना प्रत्येकी 65 लाख रुपयांची मदत

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना युद्धात जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत सरकारी घर

महाराष्ट्र सरकारने ऑन ड्युटी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी दोन सर्वात मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, सरकार या पोलिसांच्या कुटुंबाला / वारसाला प्रत्येकी 65 लाख रुपये देणार आहे. सोबतच, कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलिसाचे कुटुंबीय ज्या सरकारी घरात राहत होते त्यांना रिटायरमेंट पर्यंत त्या ठिकाणी राहता येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. कोरोनामुळे शहीद झालेल्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असेही गृहमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.

व्हिडिओ संदेश जारी करताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, "कोरोना फ्रंटलाइन वॉरियर्सपैकी काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा  कोरोना योध्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या डोक्यावरील छताची चिंता करावी लागणार नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांना त्यांच्या रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत सरकारी क्वार्टर्समध्ये राहता येईल." हा निर्णय मानवतेच्या आधारावर घेण्यात आला आहे. पोलिसांच्या सर्वोच्च बलिदानावर आम्ही इतके तर करूच शकतो. ऑफ ड्युटीच्या वेळी राज्यातील 4326 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 3282 पोलिस ठीक झाले आहेत. तसेच यातील 54 पोलिस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला हे अतिशय दुर्दैवी आहे असेही अनिल देशमुख बोलताना म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...