आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआचे विचारमंथन:भाजपला धडा शिकवण्यासाठी मविआची जोरदार तयारी, जागावाटपावर झाली चर्चा

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे विचारमंथन

महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे बैठक झाली. या बैठकीला तिन्ही पक्षांचे मुख्य नेते उपस्थित होते. बैठकीनंतर मविआतर्फे संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी एकत्रित पत्रकार परिषद झाली. यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजय, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा झाली.

तथापि, भाजपला धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने आहे हे समजून घेतले पाहिजे. आम्ही कर्नाटकसारखा विजय मिळवून दाखवू. तर जयंत पाटील म्हणाले, उन्हाळ्यानंतर मविआच्या बैठका सुरू करणार आहोत. लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपाबद्दल मविआचे घटक पक्ष आणि इतर पक्षांना बोलावून चर्चा करणार आहोत.

भाजपचे सरकार कसे पाडले हे जनतेला सांगणार : पटोले
नाना पटोले म्हणाले, कर्नाटकातील जनतेच्या मनात भाजप, अमित शाह आणि मोदींच्या विरोधात राग होता. त्यातूनच हा निकाल आला असून कर्नाटकात भाजपचे सरकार कसे पाडले हे जनतेला सांगणार आहे.