आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मविआ'चा एल्गार:17 तारखेला स्वाभिमानासाठी विराट मोर्चा; राज्य सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविआने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे. तर 17 तारखेला स्वाभिमानासाठी मुंबईत विराट मोर्चा​ काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मविआच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईत बोलत होते. ​​​​​​

राज्यपाल आहेत म्हणून त्याचे ऐकावे लागतंय, ते महाराष्ट्राच्या अस्मितेला छिन्न विछिन्न करत आहेत. म्हणून राज्यपाल शिवरायांबद्दल, महात्मा फूलेबद्दल बोलत वादग्रस्त बोलत आहे, हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

नेमके काय म्हणाले ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही, त्यांनी सर्वांनी एकत्र यावे, आम्ही मविआतर्फे आझाद मैदानात 17 तारखेला राज्यपालांच्या आणि सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत. गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून येथील प्रकल्प गुजरातमध्ये नेले. आता थोड्याच दिवसात कर्नाटकांच्या निवडणुकासाठी महाराष्ट्राची गावे तोडणार का असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत हे कळणार कधी, कर्नाटकात काही मंत्री जाणार होते. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा देताच दौरा रद्द करण्यात आला, इतका नेभळट महाराष्ट्र कधीही कुणीही पाहिला नाही, हे नेभळत सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले?

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आमच्यासोबत सर्व घटक पक्ष 17 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुरू असलेले वक्तव्यामुळे राज्यपालांना हटविण्यात यावे, मात्र मोर्चाच्या आधी राज्यपालांना हटवले तरी मोर्चा निघणार असेहीअजित पवारांनी स्पष्ट केले. आमच्या काळात राज्यातील कोणतीच गावे बाहेरच्रूा राज्यात जायची असे म्हणाली नाही, मात्र हे सरकार येताच अशी मागणी होत आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. कुणाच्याही काळात बॉर्डरवरची गावे असे काही मागणी केली नव्हती. या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्याने हे सर्व गोष्टी होत आहे. 6 महिन्याचा काळात मोठे अपयश आले, जे उद्योग आले तेच घालवले आणि नवीन काही प्रकल्प आणू असे म्हणतात हे सर्व या सरकारच्या काळात सुरू झाले आहे.

शिंदेंमध्ये धमक नाही?- अजित पवार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि भाजपच्या सहाय्याने मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना कर्नाटकमध्ये जात असलेल्या मंत्र्यांना रोखले, शिंदेंनी माघार घेतली आणि म्हटले की आम्ही आता जात नाही. का जात नाही तुमच्यात धमक नाही का असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्र कधी कुणासमोर झुकलेला नाही, हे सरकार असे वागू कसे शकते असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...