आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:कायदेशीर सल्ला घेऊन पदोन्नतीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणार, मी नाराज नाही, आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा - नितीन राऊत

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 मे चा जीआर रद्द होईल असा विश्वास असल्याचे देखील नितीन राऊत यांनी सांगितले

पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उर्जा मंत्री नितीन राऊत, शिशिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि के सी पाडवी हे उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून यातील कायदेशीर बाबींवर चर्चा आणि अभ्यास करून हा प्रश्न आम्ही सोडवणार असल्याचे मत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पदोन्नतीतील आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या विषयी आज सकारात्मक सांगोपांग चर्चा झालेली आहे. या विषयावर तोडगा निघेल याची मला खात्री आहे, 7 मे चा जीआर रद्द होईल असा विश्वास असल्याचे देखील नितीन राऊत यांनी सांगितले. या बैठकीत सर्वांनी कायदेशीर बाबींवर अभ्यास करायचं ठरवलं आहे. यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.

दरम्यानच्या मधल्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयात या बाबत एक याचिका दाखल झाली आहे. त्या तारखेमुळे थोडासा पेच निर्माण झालेला आहे. तरी या बाबत योग्य तो अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. तो निर्णय सकारात्मक असेल असे मत व्यक्त करतानाच मी नाराज नाही मात्र मागासवर्गीयांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे असेही नितीन राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...