आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mahad Building Incidence Updates : Siblings Out Of The Heap After 18 Hours; The Pillars Of The Building Were Already Cracked, The Death Toll 13

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाड दुर्घटना:18 तासांनंतर चिमुकली भावंडे ढिगाऱ्याबाहेर; इमारतीच्या पिलरला आधीच होते तडे, मृतांची संख्या 13

रायगड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिल्डर, तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंत्यावर गुन्हा

महाड येथे पडलेल्या ५ मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तब्बल १८ तासांनंतर मोहंमद नदीम बांगी (४) आणि त्याची बहीण रुकय्या (२) या दोन चिमुकल्यांना वाचवण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. तर मंगळवारी सायंकाळी अब्दुल हमीद काझी (७५) या वृद्धासही सुखरूपपणे मलब्याबाहेर काढण्यात आले.

मुलांना वाचवताच एनडीआरएफ पथकाचा ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर :

हा मुलगा इमारतीच्या एका पिलरजवळ बसला होता. त्यामुळे इमारत कोसळल्यानंतर सर्व मलबा आजूबाजूला पडला. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत जाऊनही बचावला. तो ईश्वराचाच मुलगा आहे, अशी प्रतिक्रिया एनडीआरएफ पथकातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

इमारतीच्या पिलरला आधीच होते तडे; मृतांची संख्या १३

महाड येथे सोमवारी कोसळलेल्या ५ मजली इमारतीच्या काही पिलरला आधीच तडे गेले होते असे आता समोर आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांची संख्या १३ वर गेली अाहे. मंगळवारी चिमुकल्या बहीण-भावाला वाचवले. मात्र त्यांची एक बहीीण अद्यापही बेपत्ता आहे, तर मुलांची आई नौसिन नदीम बांगी (३०) हिचा ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला. सायंकाळी आणखी एका ७५ वर्षीय वृद्ध अाणि एका ६० वर्षीय महिलेस ढिगाऱ्यातून सुखरूपपणे बाहेर काढले. तर किमान ३ जण बेपत्ता आहेत. याप्रकरणी आता इमारतीचे विकासक फारुख काझी, युनूस शेख यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही फरार झाले आहेत. त्यांच्यासोबतच आरसीसी कन्सल्टंट्सचे बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड आणि अभियंता शशिकांत दिघे यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तातडीने खाली आल्याने बचावलो : प्रत्यक्षदर्शी

सायंकाळी व्यायाम करून आल्यानंतर मी किचनमध्ये बसलो होतो. त्या वेळी फ्रिज काहीसा खाली गेल्याचे दिसले. म्हणून मी कुटुंबाला सोबत घेऊन पाचव्या मजल्यावरून ओरडत सगळ्यांना घेऊन खाली आलो. त्यानंतर क्षणार्धात इमारत जमीनदोस्त झाली, असा थरारक अनुभव जावेद चिंचकर याने सांगितला.