आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आमचा पक्ष जरी एनडीएत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही आशीर्वाद दिल्यास, आम्हाला लवकर एसटीच्या सवलती मिळतील, अशी विनंती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि राज्यातील भाजपचे समर्थक असलेले माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.
जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यात बोलत असताना जानकर यांनी हे वक्तव्य केले. एनडीएचे समर्थकच शरद पवार यांच्याकडे समाजाला न्याय देण्याची मागणी करत असल्यामुळे राजकीय वर्तृळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना युतीचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असे वक्तव्य केले होते. मात्र मागच्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही फडणवीस यांना धनगर समाजाला आरक्षण मिळवून देता आले नाही. याच काळात फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले महादेव जानकर यांनी आता थेट शरद पवार यांच्याकडेच मदत मागितल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पडळकर यांच्या भूमिकेला भाजपमधूनच हरताळ
जेजूरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्याहस्ते होऊ नये, यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. मात्र भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि महादेव जानकर यांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडत असल्यामुळे भाजप पक्षानेच पडळकर यांच्या भूमिकेला फारसे महत्त्व दिले नसल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.