आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचा इशारा:नारायण राणेंवरील कारवाईनंतर पुत्र नितेश यांचा शिवसेनेला इशारा, व्हिडिओ शेअर करत म्हणाले - करारा जवाब मिलेगा!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नितेश राणेंनी अक्षरशः राजनिती या चित्रपटातील एक क्लिप ट्विट करून इशारा दिला आहे. - Divya Marathi
नितेश राणेंनी अक्षरशः राजनिती या चित्रपटातील एक क्लिप ट्विट करून इशारा दिला आहे.
  • नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली. आता त्यांना जामीन मिळाला असला तरीही हा वाद निवळलेला नाही. आता राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. निलेश राणे यांनी एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.

नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतरही वाद संपलेला नाही. राणे आणि शिवसेनेतील वाद पुढेही असा सुरु राहण्याची चिन्हे आहेत. नितेश राणे यांनी राजनिती चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मनोज वाजपेयी यांचा डायलॉग आहे. आभाळाकडे थुंकणाऱ्याला कदाचित हे माहिती नसते, ती थुंकी त्याच्यावरच पडणार आहे, करारा जवाब मिलेगा... करारा जबाव मिलेगा.... हा डायलॉग आहे. नितेश यांनी हा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला थेट इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?
भाजप नेत्यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या निमित्त नारायण राणे हे सध्या कोकणामध्ये आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे न बोलता चुकून हिरक महोत्सव हा शब्द वापरला. दरम्यान तिथे उपस्थित राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले यानंतर मुख्यमंत्र्यांनी चूक सुधारत 'आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत' असे म्हटले होते. यावरुन राणे म्हणाले होते की, मी जर तिथे असतो तर कानाखाली लगावली असती. यावरुन नारायण राणेंवर टीका होत आहे आणि त्यांना अटकही झाली होती. यानंतर रात्री उशीरा त्यांना जामीनही मिळाला असला तरीही हा वाद असाच सुरु राहण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...