आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील पालघरमध्ये काही वर्षापूर्वी ईसाई धर्म स्वीकारलेल्या एका महिलेला तिच्या एका मुलाने दफन केले तर दुसऱ्या मुलाने सांकेतिक रुपात तिला मुखाग्नी दिला. पालघरमध्ये एका आईच्या अंत्यसंस्कारासाठी दोन भावांमध्ये झालेल्या वादाने 1998 मध्ये आलेल्या महेश भट्टच्या 'जख्म' चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री (पूजा भट्ट) च्या मृत्यूनंतर तिला दफन करण्यावरुन वाद होतो.
हिंदू मुलाने कपड्यांनी जाळली सांकेतिक चिता
पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की, गुरुवारी पालघर जिल्ह्याच्या वडा तहसीलच्या अवांडे गावात राहणाऱ्या 65 वर्षांच्या फुलाई धापडे यांचे निधन झाले. यानंतर दोन्ही मुले महादू आणि सुधान यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद झाला. मोठा भाऊ महादू धर्म परिवर्तन करुन ईसाई बनला होता. वाद होऊनही महादूने आपल्या आईला दफन केले. यावर नाराज असलेल्या सुधानने आईच्या कपड्यांनी सांकेतिक चिता जाळली.
पोलिसांनी कारवाई करुन वाद मिटवला
पवार यांनी म्हटले की, दोघेही मागे हटण्यास तयार नव्हते आणि वाद वाढत होता. वादामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास जवळपास 24 तासांचा उशीर झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही भावांना समजावून मधला मार्ग काढण्यात आला. पवारांनी सांगितले की, पोलिस अधिकारी सुधीर सांखे गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा केली. हे ठरवण्यात आले की, महिलेला ईसाई परंपरेनुसार दफन करण्या यावे. नंतर वसईच्या जवळ पाचू द्वीपवर पार्थिव शरीर दफन करण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.