आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Maharashtra : All Actions Against Anil Deshmukh By Order Of Modi Government, Serious Allegations Of Sachin Sawant; Asked 4 Questions To Ed

काँग्रेसचे सवाल:अनिल देशमुखांवरील सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने, सचिन सावंतांचा गंभीर आरोप; ईडीला केले 'हे' 4 सवाल

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ईडीची ही कारवाई म्हणजे राज्यातील महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच ईडीने अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली आहे. दरम्यान त्यांची आणखी 300 कोटींची संपत्ती जप्त केल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. यानंतर ईडीने अनिल देशमुखांवर आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि तपासात बाहेर आलेल्या गोष्टी यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी 4 सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून सचिन सावंतांनी ईडीला सवाल केले आहे. तसेच मोदी सरकारवर आरोपही लावला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने उत्तरे द्यावीत असे म्हणत सचिन सावंतांचे 4 सवाल

 1. अजूनही ₹ 300 कोटींच्या मीडियातील वावड्यांची पुष्टी करता का? कारण आता आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन 2005 मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ 2.67 कोटी किंमतीची आहे?
 2. फ्लॅटची किंमत 2004 मध्ये दिली गेली तर तो या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो?
 3. तुम्ही जाहीर केले की डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना ₹ 4.70 कोटी दिले. ते बार मालक अद्याप गजाआड का नाहीत?
 4. तथाकथित ₹100 कोटींच्या मागणीची माहिती असूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंह यांची चौकशी का केली जात नाही?

सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने
सचिन सावंतांनी ईडीला चार सवाल केले यासोबतच मोदी सरकावर गंभीर आरोपही केले आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे राज्यातील महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही सावंतांनी केला. सावंतींनी ट्विट केले की, 'या सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने आणि महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत या आमच्या म्हणण्याला यातून बळ मिळत आहे.'

परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बनंतर देशमुख अडचणीत
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख एपीआय सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिले असल्याचा आरोप परमबीर सिंहांनी यांनी केला आहे. तसेच या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

बातम्या आणखी आहेत...