आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस फडणवीसांचा टोला:'...कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते', नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर देत अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. नवाब मलिक हे या प्रकरणाशी संबंधित एनसीबीवर विविध आरोप करत आहेत. आता त्यांनी फडणवीसांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यावेळी त्यांनी ड्रग पॅडलर राणा याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांसोबतचा फोटो शेअर करत आरोप केले होते. यानंतर अमृता फडणवीसांनी ट्विट करत याविषयावर भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत जयदीप चंदुलाल राणा नावाच्या व्यक्तीचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृतासोबतचा फोटो शेअर केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या म्युझिक व्हिडिओला ड्रग पॅडलर राणा यांनी आर्थिक मदत केल्याचा दावा मलिक यांनी केला होता. फडणवीसांच्या आश्रयाने अमली पदार्थांचा व्यापार सुरू असल्याचेही ते म्हणाले होते. यावर अमृता फडणीसांची प्रतिक्रिया आली आहे.

नवाब मलिकांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर अमृता फडणवीस देखील मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी एक ट्विट करत अप्रत्यक्षपणे नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. 'चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!' असे अमृता म्हणाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...