आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra And Karnatak Border Desoute, News And Updates; 'Declare Karnataka As A Union Territory; Demand Of Chief Minister Uddhav Thackeray

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद:'कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकमध्ये सरकार कोणाचेही असो, अन्याय मराठी माणसावरच होतो

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर मोठे विधान केले आहे. 'कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा', अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प" या डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली. या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'एखादे प्रकरण कोर्टात असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायाचे नसतात. असे केल्यास, कोर्टाचा अवमान समजला जातो. पण, कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर केले आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता हा वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'कर्नाटकमधील वादग्रस्त भागाबाबत विचार करताना आपण नेहमीच कायद्याचा विचार करतो. पण कर्नाटक कायद्याचा विचार करत नाही. कर्नाटकात सरकार कुणाचेही असो मराठी माणसावर ते अन्याय करतातच. त्यामुळे कर्नाटकचा भूभाग आपल्याकडे आणण्यासाठी आपण सोबत मिळून लढायला हवे.'

'कर्नाटकबद्दल आपला दुस्वास नाही. त्यांच्याबद्दल आकस नाही. पण त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध झालाच पाहिजे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. तसेच या सरकारने हा प्रश्न सोडवला नाही तर कोणतेच सरकार हा प्रश्न सोडवणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एका जिद्दीने हा प्रश्न सोडवला पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येकाची चूल वेगळी असून त्यावर कर्नाटक सरकार त्यांची पोळी भाजून घेत आहे', असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी ठाम भूमिका मांडावी – शरद पवार

शरद पवार यांनी यावेळी सीमाभागातील नागरिकांच्या लढ्याचे वर्णन करुन वर्षानुवर्षे शेतकरी, विद्यार्थी, तरुण, वयस्क आदी सर्वच घटकांनी हा लढा चालू ठेवला असे सांगितले. ते म्हणाले, सीमाभागात ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ची स्थापना करुन सत्याग्रहाची भूमिका घेतली. यासाठी अनेकांनी यातना भोगल्या. तथापि, सीमाभागातील नागरिक या सगळ्या यातना पिढ्यानपिढ्या सहन करत आहेत.

महाजन आयोगाची स्थापना, मधु मंगेश कर्णिक यांच्यासह सीमाप्रश्नातील न्यायालयीन प्रकरणासाठी पुरावे जमा करण्यासाठी केलेले प्रयत्न, महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना तसेच सत्याग्रह, त्यात राजकीय नेतृत्त्वाने भोगलेला तुरुंगवास आदींचा उल्लेख करुन श्री. पवार पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत.

बातम्या आणखी आहेत...