आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी जबाबदारी:​​​​​​​जगनमोहन रेड्डी यांना उद्धव ठाकरेंचा फोन, तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर मिळाले पद

देशातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांची ट्रस्टचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीमध्ये देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर मिळाले पद
आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थान देशातील सर्वात प्रतिष्ठित असे देवस्थान आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ लागलेली असते. यासाठी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डींसोबत फोनवर संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकरांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांची ओळख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अशी आहे. गटप्रमुख त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सचिव आणि आता शिवसेना सचिव असा नार्वेकरांचा राजकीय प्रवास आहे. गेल्या वर्षी मिलिंद नार्वेकर यांची मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून देखील निवड करण्यात आली आहे. शिवसेना आणि मिलिंद नार्वेकर या समीकरणाची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते.

बातम्या आणखी आहेत...