आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही मंत्री असाल घरी:विधान परिषदेत छाती बडवून काय बोलताय; उपसभापती गोऱ्हेंनी काढली गुलाबराव पाटलांची खरडपट्टी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही लगेच खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? विधान परिषदेत छाती बडवून काय बोलताय, मंत्री असाल तुमच्या घरी, अशा शब्दांत गुरुवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची खरडपट्टी काढली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा शिंदे आणि शिवसेना गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

दानवे-पाटील जुंपली

विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे आपला मुद्दा मांडला. याला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, जर दादागिरी केली जाईल, तशी भाषा असेल, तर आम्हाला ही उत्तर देता येईल. त्यांच्या या विधानावर दानवे यांनी आक्षेप घेतला आणि गुलाबराव पाटलांनी माफी मागावी अशी मागणी केली.

मी कॅबिनेटमधला सहकारी

पहिला प्रश्न राखीव ठेवला. गुलाबराव पाटील खाली बसून बोलू नका. तुम्हाला काय बोलायचे आहे, ते बोलावे, कुणालाही इशारा देऊ नये, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, "एका प्रश्नावर शिक्षणमंत्री उत्तर देत होते, पण विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की, एक मंत्री धमकी देत आहे. मी एक कॅबिनेटमधला सहकारी आहे. अनिल परब यांना प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिले नाही."

गुलाबराव...खाली बसा

गुलाबरावांनी सुनावताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "तुमच्या विभागाचा प्रश्न नाही, दीपक केसरकर यांच्या विभागाचा हा प्रश्न आहे. तुम्ही हातवारे करून काय बोलताय, ही सभागृहातली पद्धत नाही. दुसऱ्या मंत्र्यांच्या प्रश्नावर आरोप करायचे. तुम्हाला ताकीद देतेय गुलाबराव...खाली बसा. छातीवर हात देवून काय बोलताय, तुम्ही मंत्री असाल तर घरी", असे म्हणत सभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावले.

माझ्या कारकिर्दीला डाग

'प्रश्न राखून ठेवू नका याचा अर्थ असा होईल की, माझ्याकडे उत्तर नाहीये माझ्या कारकिर्दीला हा डाग असेल त्यामुळे राखीव ठेवू नका मंगळवारी दालनात बैठक घेवू, असे म्हणत दीपक केसरकर आपले म्हणणे मांडले.

बातम्या आणखी आहेत...