आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Assembly Monsoon Session; Opposition Party Chanting In Vidhanbhavn Agaisnt Shinde Fadanvis Government Showing Posters Of Opponents

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो:मविआचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर पोस्टर दाखवत आंदोलन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा... ईडी सरकार हाय हाय... या सरकारचं करायचं काय... खाली डोकं वर पाय... आले रे आले ५० खोके आले... खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो... स्थगिती सरकार हाय हाय... महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी... आले रे आले गद्दार आले.. अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ईडी सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ईडी सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले.
शिंदे सरकारविरोधात गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
शिंदे सरकारविरोधात गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून बेकायदेशीर सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारचा मविआच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारचा मविआच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...