आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधीमंडळ अधिवेशन:विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत पार पडणार? अधिवेशन मुंबईतच व्हावे यासाठी महाविकास आघाडीतील नेते आग्रही

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि विधान परिषद निवडणूक तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या पार्श्वभुमीवर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पार पडणार आहे.

हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत असते, परंतु मीडिया रिपोर्टनूसार, मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता हे अधिवेशन मुंबईतच होण्याची चिन्हे आहेत. लवकर या आठवड्यात तसा निर्णय सरकार व प्रशासन घेणार आहे. विशेष म्हणजे अधिवेशन नागपूरलाच व्हावे यासाठी भाजपचे नेते आग्रही आहेत. तर दुसरीकडे हे अधिवेशन मुंबईतच व्हावे यासाठी महाविकास आघाडीतील नेते आग्रही आहे.

जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, मंत्रालय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीची हालचाली दिसत नाही. अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते.

अधिवेशनाला जेमतेम 15 दिवस शिल्लक असताना सल्लागार समितीच्या बैठकीचा पत्ता नाही. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना रुग्णालयातून अद्याप सुट्टी मिळालेली नाही. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी हे अधिवेशन मुंबईत घ्याव असे एकमताने ठरवले आहे.

गेल्या वर्षी अधिवेशन मुंबईत पार पडले होते
गेल्या वर्षी देखील हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत पार पडले होते. कोरोनाचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच ते अधिवेशन दोनच दिवसात आटोपण्यात आले होते. यावर्षी देखील अधिवेशन नागपूरला व्हावे अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. मात्र यंदाचे अधिवेशन देखील मुंबईत होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...