आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra ATS's Big Action: Another Suspect Caught From Mumbai, Mumbai Terrorist Jan Mohammad Entrusted The Task Of Collecting Weapons News And Live Updates

ISI-अंडरवर्ल्डचे टेरर मॉड्यूल:मुंबईतून आणखी एका संशयिताला अटक, प्रयागराजमध्ये एका वांटेडचा आत्मसमर्पण; दुसऱ्या संशयिताने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा दावा केला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झाकीरवर शस्त्रे जमा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

महाराष्ट्र एटीएसने रात्री उशिरा कारवाई करत आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्याचे नाव झाकीर असून एटीएसने त्याला मुंबईतील नागापाडा येथून अटक केली. दिल्लीत पकडलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याने महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. आज या संशयित दहशतवाद्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुनावणीदरम्यान, दिल्लीच्या स्पेशल सेलची टीम झाकीर चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे, ISI-अंडरवर्ल्डच्या टेरर मॉड्यूलमध्ये वॉन्टेड असणार हुमाईद उर रहमान याने प्रयागराजमधील करेली पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आहे. हुमैद हा ओसामाचा काका असून त्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे.

ओसामाचे वडील दुबईमध्ये आयएसआय हँडलर म्हणून काम करत होते असे तपासात समोर येत आहे. दुबईत बसलेल्या आपल्या भावाच्या सांगण्यावरून तो भारतातील मिशन हाताळत होता. हुमाईद उर रहमान हा लखनौमध्ये अटक केलेल्या दहशतवादी आमिर बेगच्या बहिणीचा सासरा आहे. करेली पोलिसाकडून हुमेद उर रहमानची चौकशी अद्यापही सुरु आहे. त्यामुळे चौकशीतून काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आणखी एका वॉन्टेडने आत्मसमर्पण केल्याचा केला दावा
प्रयागराजचा रहिवासी असलेल्या शाहरुखने एक व्हिडीओ जारी करत स्वत:ला आत्मसमर्पण केल्याचा दावा केला आहे. परंतु, पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत असे काहीही सांगण्यात आलेले नाही. पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शाहरुखने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे शाहरुख तोच व्यक्ती आहे, ज्यांच्या पोल्ट्री फार्ममधून एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी आयईडी जप्त केले होते. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या झीशानच्या सांगण्यावरून ही कारवाई केली होती.

शाहरुखचा हा फोटो पोलीस स्टेशनच्या आत जाताना काढला आहे.
शाहरुखचा हा फोटो पोलीस स्टेशनच्या आत जाताना काढला आहे.

झाकीरवर शस्त्रे जमा करण्याची जबाबदारी
महाराष्ट्र एटीएसएनने रात्री उशिरा मोठी कारवाई करत झाकीर नावाच्या व्यक्तीला मुंबईतून पकडले आहे. झाकीर हा मुंबईच्या जोगेश्वरी भागातील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांशी झाकीरचे संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. झाकीरच्या आधी दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मद नावाच्या संशयित दहशतवाद्याला कोटा रेल्वे स्थानकावरून अटक केली होती. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या झाकीरची चौकशी महाराष्ट्र एटीएसच्या मुंबई कार्यालयात सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, जान मोहम्मदने झाकीरला शस्त्रे आणि स्फोटके मुंबईत आणण्यास सांगितले होते.

जान मोहम्मद 20 वर्षांपासून डी गँगच्या संपर्कात होता
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केलेला जान मोहम्मद हा मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला जान 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. जान मोहम्मद शेख कर्जात होते आणि पैशाची गरज होती. एटीएसने पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, त्याने कर्ज घेतले होते आणि टॅक्सी घेतली होती पण कर्ज फेडू शकले नाही आणि पुन्हा डी-गॅंगशी संपर्क साधला.

दहशतवाद्यांनी मुंबईत मोठा स्फोट घडवण्याची योजना आखली होती
दिल्ली स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले 6 संशयित दहशतवादी गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईसह देशाच्या विविध भागात स्फोट घडवण्याचे नियोजन करत होते. त्याच्या अटकेपूर्वीच मुंबई रेल्वे पोलिसांना (जीआरपी) संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट मिळाला होता. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने इशारा दिला होता की, अतिरेकी गॅस हल्ला किंवा प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या गर्दीला ट्रेनने तुडवू शकतात. दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर जीआरपीने मुंबईतील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली आहे. काही प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्याचे मार्गही बंद करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...