आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्र एटीएसने सोमवारी भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी कथितरित्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी 3 बांग्लादेशी नागरिकांसह आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून दोन आमदारांचे लेटर हेडही जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 25 वर्षीय मोहम्मद इजराइल हुसैन, 23 वर्षीय फौज अहमद मुजराल आणि 28 वर्षीय अकरम खान या बांग्लादेशी नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय, साजिद हैदर मुंसी (50) आणि अब्दुल रहीम शेख (50) एजंट असून, इतर तिघांना यांची मदत केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
अशा आरोपींपर्यंत पोहोचली पोलिस
महाराष्ट्र एटीएसकडून सांगण्यात आले की, काला चौकी ब्रांचला नोव्हेंबरमध्ये गुप्त माहिती मिळाली होती की, बांग्लादेशी नागरिक अकरम खान (28) मुंबईमध्ये अवैधरित्या राहत असून, आपल्या देशातील नागरिकांना बांग्लादेशी पासपोर्ट मिळून देण्यासाठी मदत करत आहे. यानंतर सोमवारी त्याला सेवरीमधून अटक करण्यात आले. त्याचे खरे नाव अकरम नूर अलाउद्दीन नबी शेख आहे आणि तो बांग्लादेशातील नोआखाली जिल्ह्याचा रहिवासी आहे.
85 बांग्लादेशींचे फेक पासपोर्ट बनवल्याचा आरोप
वडाळा आणि मुंब्रातील दोन व्यक्तींनी त्याला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि भारतीय पासपोर्ट मिळवणे आणि अवैधरित्या भारतात राहण्यास मदत केली होती. अविन केडारे आणि नितीन निकम अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खोटा रबर स्टँप आणि पासबूक बनवल्याचा आरोप आहे.
एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंब्रातील राफिक सैय्यदच्या चौकशीदरम्यान खुलासा झाला की, तो 2013 पासून बनावट पासपोर्ट बनवण्याचे काम करतो आणि त्याने आतापर्यंत 85 बांग्लादेशी नागरिकांना पासपोर्ट बनवून दिले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.