आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर हल्लाबोल:शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही; केंद्रात असलेल्या सरकारने माणूसकी संपवली, सुप्रिया सुळेंनी भाजपला फटकारले

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजही तो व्हिडीओ बघितला की अंगावर शहारे येतात. तळपायाची आग मस्तकात जाते

राज्यात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी हा बंद पुकारण्यात आला. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्रात असलेल्या भाजप सरकारला फटकारले आहे. शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही. केंद्रात असलेल्या सरकारने माणूसकी संपवली असल्याची संतप्त प्रतिक्रिया सुळेंनी दिली.

सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, 'लखीमपूरमध्ये हत्याकांड आणि देशभरात अन्नदात्याविरोधात जो अन्याय होत आहे, त्याविरोधात महाराष्ट्रात हा बंद पुकारला आहे. राजकारणात माणुसकी शिल्लक नाही हे दुर्दैव आहे. एकेकाळी राजकारणात माणूसकी होती, मात्र केंद्रात असलेल्या सरकारने ती माणूसकी संपवली आहे. मंत्र्याच्या मुलाने ज्या लोकांचा खून केला त्याविरोधात आजचा बंद आहे.' असे सुळे म्हणाले

...आजही अंगावर शहारे येतात
लखीमपूर येथे गाडीखाली चिरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आजही तो व्हिडीओ बघितला की अंगावर शहारे येतात. तळपायाची आग मस्तकात जाते. एवढा क्रूरपणा तुम्ही कधी पाहिला आहे का? ही घटना क्रूर आहे आणि त्यावर केवळ जाहीर निषेध करून संपणार नाही, तर दोषींना शिक्षाव्हायलाच हवी. आरोपीला अटक होण्यासाठी इतका वेळ लागला. केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यायला हवा'

...सत्तेची मस्ती बाकी काही नाही
या घटनेविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'ही सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही. शेतकऱ्यांना चिरडण्याचा तो व्हिडीओ तुम्ही पाहा, तुम्हाला त्यात माणूसकी दिसते आहे का? पत्रकार असो, समाजकारणी असो पण सर्वात आधी आपण माणसं आहोत. त्यात क्रूरता आहे असे तुम्हाला वाटत नाही का? कोणतेही सरकार असो उत्तर प्रदेशात जी कृती झाली ती निंदनिय आहे. केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना आणि शतकऱ्यांना न्याय द्यायला हवा'

बातम्या आणखी आहेत...