आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्याने तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.
तत्वतः मंजुरी दिली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगी यांनी तत्वतः मंजुरी दिली.
शिंदेंचा अयोध्या दौरा
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही सांगितले. त्यावर योगिनी समाधान व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आमंत्रित करून अयोध्येला आवर्जून भेट द्यावी असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक तसेच खासदार रवी किशन हेदेखील उपस्थित होते.
राज्यपालांची घेतली भेट
योगी आदित्यनाथ यांना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता अक्षय कुमारचीही विशेष भेट घेतली. योगींनी उत्तर प्रदेशातल्या फिल्मसिटीबाबत अक्षयशी विशेष चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
उद्योगपतींना भेटणार
योगी आदित्यनाथ आपल्या या दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते विविध उद्योगपतींसोबत वन टू वन बैठक घेणार आहेत.
संबंधित वृत्तः
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.