आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरस्कार जाहीर:ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, राज्य सरकारने जाहीर केला पुरस्कार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला देण्यात येईल यावर चर्चा सुरू होती. अखेर ख्यातनाम गायिका आशा भोसलेंना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित होते. आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनेक दशके राज्यासह देशाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेत. आशा ताईंनी मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांमध्येही गाणी गायली आहेत. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली 'मलमली तारुण्य माझे', 'केव्हातरी पाहाटे', 'बुगडी माझी सांडली गं', अशी काही गीते अजरामर ठरली आहेत.

बातम्या आणखी आहेत...