आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय:आता राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच असणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दुकानाच्या पाट्या आता मराठीमध्येच दिसणार आहेत.

मराठीत असणाऱ्या पाट्या या मोठ्या अक्षरात असणे बंधनकारक असणार आहे. दुकानात एक जरी व्यक्ती काम करत असली तरी दुकानावर मराठी भाषेतील पाटीचा नियम अनिवार्य असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी याविषयी माहिती दिली आहे.

यापूर्वी देखील दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्या असाच राज्य सरकारचा नियम होता. मात्र याची अमलबजावीन केली जात नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरांमध्ये नाव होते. तर मराठीतील नावे ही लहान अक्षरांमध्ये ठेवली जात होती. आज घेतलेल्या निर्णयानंतर मराठी नावे ही मोठ्या अक्षरात असणे अनिवार्य असणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर मंत्रिमंडळाचा बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळले होते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. तसेच त्यावर उपाययोजना करण्याचीदेखील मागणी होत होती. अखेर मंत्रीमंडळाने आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेत पळवाट बंद केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्या देखील आता मराठीत कराव्या लागणार आहेत.