आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंचा टोला:पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता, तसेच मी देखील धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतेय; पंकजा मुंडेंचा अप्रत्यक्षपणे पक्षातील विरोधकांवर निशाणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच पांडवांकडे संयम होता तसाच माझ्याकडेही आहे

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यानंतर मुंडे समर्थकांनी तीव्र नाराजी दर्शवली. यातूनच त्यांनी एका पाठोपाठ एक राजीनामे देण्यास सुरुवात केली. दरम्यान पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. या सर्व समर्थकांचे राजीनामे पंकजा यांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी मुंबईत आपल्या समर्थकांसोबत संवाद साधला.

यावेळी त्यांनी त्यांना मंत्रिपदाची लालसा नसल्याचे स्पष्ट केले तसेच सत्तेसाठी मी राजीनामा देणार नसल्याचे म्हटले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, 'केंद्रीय मंत्रीपद मिळालेले नाही तरीही आज मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री आहे. मला पुढचा प्रवास खडतर दिसतोय. मागेही असाच होता यापुढेही तसाच असणार आहे. निवडणुकीत माझा पराभव झाला पण म्हणून मी संपलेले नाही. संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपलेले असते. योग्य निर्णय घ्यायची वेळही योग्य असते. यामुळे आपला जो प्रवास सुरू आहे त्याला तूर्त स्वल्पविराम देऊ' असेही पंकजा म्हणाल्या.

पाच पांडवांकडे संयम होता तसाच माझ्याकडेही आहे
आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर बोलताना पंकजा मुंडे यांनी पाच पांडवांचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या की, 'पाच पांडव जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो खरंच चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करते. जो चांगला असतो तो लोकांच्या भल्यासाठी युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. माझीही तीच भूमिका आहे. कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनाने पांडवांच्या सोबत होते. फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते हे विसरू नका' असे म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे पक्षातील विरोधकांवर निशाणा साधला. मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...