आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांसोबत भाजपची चर्चा:भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंददार चर्चा! सह्याद्री अतिथीगृहावर 20 मिनिटे चालली खलबते

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत. भाजप व शिवसेनेत या वेळी अटीतटीचा सामना होणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. ‘मार्मिक’ वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत दरेकरही उपस्थित होते. मुंबईतील सहकारी संस्थांकडून पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दीड कोटीची मदत देण्यात आली. मदतनिधी देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व दरेकर यांनी केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंददार चर्चा झाली.

मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत. भाजप व शिवसेनेत या वेळी अटीतटीचा सामना होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दरेकर आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेला महत्त्व आहे. दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. ते मनसेत होते. सध्या प्रदेश भाजपचे सर्वेसर्वा फडणवीस यांच्या जवळचे आहेत. दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याची सहकार विभाग चौकशी करत आहे. त्यामुळे दरेकर आणि ठाकरे यांच्यात याप्रकरणी चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...