आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजासाठी अर्थसंकल्पात काय?:'शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने, विकेल ते पिकेल योजनेसाठी 2100 कोटी रुपये'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 वर्षात बाजार समित्यांसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाणार आहे.

3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने
अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा म्हणजे, तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. 42 हजार कोटींचे पीक कर्ज देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असणार आहे.

कृषी विद्यापीठांना दरमहा 200 कोटी
कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठीही राज्य सरकारने महत्त्वाची तरदूद केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 200 कोटी दरमहा देण्यात येतील. अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. यासोबतच 4 वर्षात बाजार समित्यांसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जे विकेल ते पिकेल या योजनेसाठी 2100 कोटी
विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. तसेच कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार आहे.

एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी
एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 3700 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अमरावतीच्या मोर्शीमध्ये संत्रा प्रकल्पाची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...