आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात देंवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. काल साजरा झालेल्या महिला दिनानंतर महिलांसाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्यात आले.
लेक लाडकी अभियान
राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' अभियान सुरू करण्यात आले आहे. पिवळया व केशरी क्षिधापत्रीका असणाऱ्या कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, चौथीत 4 हजार, सहावीत 6 हजार तर अकरावीत 8 हजार रूपये देण्यात येणार आहेत. लाभार्थी मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. लेक लाडकी अभियान सुरू करण्यात आले आहे. महिलांना राज्य परिवहन मंडणाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50 टक्के सूट देण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अंगणवाडी-आशा सेविकांच्या मानधनात वाढ
राज्यात 81 हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांसाठी 3500 तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन 4 हजार रुपये आहे. त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरून 10 हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200 रुपये एवढे करण्यात आले आहे. अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरून 5525 रुपये करण्यात आले आहे.
नोकरदार महिलांसाठी ‘शक्तीसदन’ योजना
अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.