आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प 2022:आरोग्य सेवांसाठी 3 वर्षांसाठी अर्थसंकल्पात 11 हजार कोटींच्या निधीची तरतूद, महाविकास आघाडीच्या बजेटमधून आरोग्यासाठी नेमके काय?

मुंबई6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी विधीमंडळात वर्ष 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी आरोग्य सेवांवर देखील भर दिला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, येत्या तीन वर्षात 11 हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

आरोग्यासाठी महत्त्वाच्या घोषणा?

 • नियमित अर्थसंकल्पाव्यतिरिक्त राज्यातील आरोग्य सुविधांवर करणार 3 हजार 111 कोटींचा निधी खर्च केला जाईल.
 • पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करुन देणार.
 • प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसीन रुग्णालय उभारणार, त्‍यासाठी 3 हजार 183 कोटींचा निधी
 • सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार
 • टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगडमधील खानापूर जमीन देणार
 • मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार
 • ग्रामीण भागातील रुग्णालयातील रुग्णांना शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथेक्रिप्सी उपचार उपलब्ध करुन देणार.
 • मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात फेको ही आधुनिक उपचार पद्धती सुरु करणार. एकूण 60 रुग्णालयात ही थेरपी सुरु करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल.
 • कॅन्सरच्या रुग्णांवर वेळेत निदान उपचार होण्याकरिता, 8 आरोग्यमंडळांसाठी 8 मोबाइल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार, 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
 • जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार
 • ग्रामीण भागातील जनतेसाठी शिवआरोग्य योजना सुरु करण्यात येणार
 • प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करण्यात येणार
 • देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार
 • पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था स्थापन करण्यात येणार
 • सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार 2061 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार
बातम्या आणखी आहेत...